नील बट्टे सन्नाटा
आज खूप दिवसांनी एक खूप छान सिनेमा पहिला. आई मुलीच्या गोड नात्यावर आधारित. खरंतर तो प्रचारकी थाटाचा होऊ शकला असता पण तो अगदी शेवटचा थोडासा भाग आहे. खुसखुशीत संवाद, पात्रांचा सुंदर अभिनय आणि आपल्याला कधी ना कधी आलेले तसे अनुभव.
एक मरमर काम करणारी मोलकरीण(बाई ) आणि तिच्या उडाणटप्पू लेकीची कथा. पण उगीच गरिबी, अन्याय, पैशामुळे नाकारले जाणे वगैरे मेलोड्रामा औषधाला पण नाही. आई चंदा आणि तिची मुलगी अपेक्षा उर्फ अप्पू ह्यांची हि कथा. अप्पू चे स्पष्ट (!) विचार .. इंजिनियर ची मुलं इंजिनिअर, डॉक्टर ची मुलं डॉक्टर तशी कामवाल्या बाई ची मुलगी कामवाली बाई. ती काय शिकून इंजिनिअर आणि डॉक्टर थोडीच होणार. अभ्यास करून करायचे काय .. आणि त्यातून ते गणित .. त्यात तर नील बट्टे सन्नाटा म्हणजे टोटल अंधार .. ओ म्हणता ठो कळत नाही. शाळेत जावे, मित्र मैत्रिणीन बरोबर दंगा मस्ती करावी आणि घरी परत यावे असे 'साधे' विचार. पण आई ला कुठे असं वाटतंय. तिची मुलीला खूप शिकवायची इच्छा. शाळेतल्या मास्तरांनी पण सगळी अशा सोडलेली. शेवटी आईच शाळेत विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेते आणि मुलीशी पैज लावते कि दाखव माझ्या पेक्षा गणितात जास्ती मार्क मिळवून. असे अनेक चढ उतार वळणं घेत मुलीला शिक्षणाचे महत्व कळते आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तिला भारतीय प्रशासनिक सेवेत मुलाखतीला बोलावतात ह्या मुक्कामावर सिनेमा संपतो. मुलीला प्रश्न विचारतात कि तुला IAS का व्हायचे आहे तर ती म्हणते कारण मला 'बाई' व्हायचे नाही आहे !!
अशा अप्पू ठीक ठिकाणी असतात पण चंदा मात्र फारशा नसाव्यात. मला अशा परिस्थितीतुन वर आलेल्या लोकांचे विलक्षण कौतुक वाटते आणि आपल्या नाकर्तेपणाची लाज. म्हणजे काही केले नाही असे नाही पण ह्या पेक्षा कितीतरी जास्ती करू शकतो पण ध्येय नसल्यामुळे आळसात वेळ घालवतो. त्यात चंदाच्या तोंडी एक खूप छान वाक्य आहेत कि "गरीब तो वह होते है जिनके पास कोई सपना हि नही होता" !!! आणि 'सिखने कि कोई उम्र नही होती'. असाच एक प्रयत्न मी पण करून पाहायचा ठरवले आहे :)