प्रातःस्मरण
खरंतर आमच्या घरात कोणी भाविक किंवा आस्तिक वगैरे नाही. आजी आजोबाच आस्तिक नव्हते त्यामुळे आम्ही पण कुणी नाही. आस्तिक नाही म्हणजे नास्तिक होते इतका सरळ त्याचा अर्थ नाही. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता असं म्हणू हवं तर . मी आजोबांना (ज्यांना आम्ही भाऊ म्हणत असू) कधीच पूजा करताना किंवा देवळात जाताना पहिले नाही. आजी करत असे पण ते 'देह देवळात चित्त ... ' अशा प्रकारची रोजची पूजा असे. लक्ष स्वैपाकघरात कुकर च्या किती शिट्ट्या झाल्या आहेत किंवा काकू ला काहीतरी सूचना देणे चालू असे पूजेच्या वेळी.
ह्या सगळ्याला विसंगत वाटावे अशी एक गोष्ट मी आणि त्यांच्या सर्व नातवंडांनी लहानपणापासून पहिली ती म्हणजे भाऊ रोज सकाळी न चुकता एक प्रातःस्मरण म्हणत असत. त्यात ईशावास्योपनिषदातले श्लोक, तुकारामांचे अभंग , संस्कृत श्लोक, हिंदी दोहे असे सगळं असे. ते त्यांनी कुठून जमवले होते किंवा त्याच क्रमाने का म्हणत असत हा प्रश्न तेंव्हा पडला नाही आणि आज पडून सांगायला ते नाहीत. बाबा, काका सांगतात कि ते त्यांनी त्यांच्याही बालपणापासून ऐकले आहे.
परवा मी ,ताई आणि गूगल नी बसून आठवतील तितके लिहून काढले. त्यामुळे माझे मन नकळत ३५-४० वर्ष मागे गेले आणि आजी, भाऊ, अकोला, चुलत भावंडांसोबत काढलेल्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणी फेर धरू लागल्या.
तर असे हे प्रातःस्मरण विस्मरणात जाऊ नये म्हणून इथे लिहिते आहे. त्या आधी भाऊंबद्दल थोडेसे. त्यांचा जन्म १९११ सालचा यवतमाळचा . बहुतेक वसंत पंचमी चा म्हणून नाव वसंत. शिक्षण B.Sc बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून, मग BT. अकोल्याला New Era शाळेतुन १९७१ ला हेडमास्तर म्हणून सेवा निवृत्त. संस्कृत आणि इंग्रजी वर प्रभुत्व आणि भगवद्गीता पूर्ण पाठ. आणि अगदी निर्मळ स्वभाव .
ओम ईशा वस्यामिदं सर्वं यत्किं च जगत्यां जगत
तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम
तेन त्यक्तेन भुंजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम
प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम् ।
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजङ्गम इव प्रतिभासितं वै ।
प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम् ।
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्घः ।
प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण
यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोचं
स्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम् ।
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रव्रिता |
या वीणा वरा दंडमंडित करा या श्वेत पद्मासना ||
या ब्रह्मच्युत शंकरा प्रभुतिभी देवी सदा वन्दिता |
सामा पातु सरस्वती भगवती निशेश्य जाड्या पहा ।
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥
स्वस्ति प्रजाभ्याम परिपालयंताम
न्यायेंन मार्गेण महिम माहीस
गोब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं
लोकाः समस्त: सुखिनो भवन्तु ।
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू वोळखावा । देव तेथेचि जाणावा
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयीं
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूर्ती
हेची थोर भक्ती आवडे देवा । संकल्पावी माया संसाराची
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असु द्यावे समाधान
वाहिल्या उद्वेग दु:खची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे
तुका म्हणे घालु तयावरी भार। वाहु हा संसार देवापायी
का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसितो जनासी एकलासी
तेणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती । वाढवी श्रीपती सवे दोन्ही
फुटती तरुवर उष्णकालमासी । जीवन तयासी कोण घाली
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनी
तुका म्हणे ज्याचें नांव विश्वंभर । करा निरंतर ध्यान त्याचें
माझे मज कळो येती अवगुण । काय करू मन अनावर
आता आड उभा राहे नारायणा । दयासिंधुपणा सांच करी
वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रिया आधीन झालो देवा
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरी उदास मायबापा
जन्ममरणांची। पाउले टाकीत
येतो मी धावत। भेटावया
पापांचे पर्वत। सोडो निया दूर
येतो तुझे दार। गाठावया
दिवसेंदिवस। होउनी निर्मळ
चरणकमळ। पाहिन तूझे
कधी तो सोन्याचा। येईल दिवस
पुरेल ही आस। अंतरीची
हरी से लगीर हो रे भाई,'तेरी बिगड़ी बात बन जाइ
रंका तारे बंका तारे,तारे सदन कसाई
सुआ पढ़ाके गनका तारी-तारी मीराबाई
दुनिया दौलत माल खजाना,बधिया बैल चुराई
जबर काल का डंका बाजे, तो खोज खबर ना पाई
सत्त की भक्ति कर घट भितर ,छोड़ कपट चतुराई
सेवा भक्ती और अधीनता,सहज मिले रघुराई
तेरा बनत बनत बन जाई , 'तेरी बिगडी बात बन जय
ॐ तत्सत्श्री नारायण तू पु रुषोत्तम गु रु तू।
सिद्ध बुद्ध तूस्कन्द विनायक सविता पावक तू॥
ब्रह्म मज़्द तू यह्व शक्ति तू एसु वपता प्रभु तू।
रुद्र विष्णू तू रामकृष्ण तू रहीम ताओ तू॥
वासुदेव गो विश्वरूप तू चिदानन्द हरी तू।
अद्वितीय तू अकाल निर्भय आत्मलिंग शिव तू॥
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मानुगो गच्छति जीव एकः।।
देहदृष्टया तु दसोऽ हं जीव दृष्टया त्वदंशक:।
आत्मदृष्टवा त्वमेवाहमिति में निश्चिता मति:।।
Comments