बुडापेस्ट - हम दिल दे चुके सनम
मध्ये एकदा चॅनेल सर्फिंग चा रिकामटेकडा उद्योग करताना 'हम दिल दे चुके सनम' लागला होता आणि त्यातला शेवटचा फार भावुक प्रसंग चालू होता ज्यात ऐश्वर्या अजय देवगण कडे परत जाते. पण माझे लक्ष मात्र दर वेळी हा प्रसंग पाहताना मागच्या रोषणाई केलेल्या ब्रिज कडे जाते. कारण जरी सिनेमात ते दृश्य इटली मधले आहे असे सांगितले आहे तरी त्या सर्व सिनेमाचे शूटिंग मात्र बुडापेस्ट ला झाले आहे. बुडापेस्ट ला गेल्या गेल्या आमच्या कंट्री मॅनेजर ने दिलेली हि पहिली माहिती जी आजवर माझ्या लक्षात आहे !
काही माणसं किंवा जागा ह्यांच्याशी आपला अगदी अल्पकाळ संबंध आला असला तरी कायम आपल्या मनात जागा धरून असतात. बुडापेस्ट हा असाच माझ्या reminiscences चा भाग आहे. ज्याचा डिक्शनरी मधला अर्थ 'भूतकाळाच्या रम्य आठवणी' आहे.
भूगोलाबाबतच्या अज्ञानामुळे जायला निघाले तेंव्हा हंगेरी हा देश नक्की आहे तरी कुठे हे पाहण्या पासून तयारी. पूर्व युरोपात आहे इतकीच माहिती. आणि आपल्या कडून तिथे जायला फ्रॅन्कफुर्ट मार्गे जावे लागते असे कळले. तिथली भाषा माग्यार आणि चलनाचे नाव forint हि माहिती कळली. त्यावेळी जेमतेम १० वर्षांपूर्वी कम्युनिस्ट जोखडातून मुक्त झालेला आणि अचंबित होणारी प्रगती केलेला हा देश.
विमान प्रवासात पाहिले तर विमान बुडापेस्ट वरूनच जात होते. फ्रॅन्कफुर्ट ते बुडापेस्ट हे अंतर जेमतेम ४५ मिनिटांचे आणि त्या साठी मी एअरपोर्ट वर ६ तास थांबले होते. बुडापेस्ट ला विमान उतरले तर सगळी कडे फक्त बर्फाची पांढरी चादर पसरलेली. आणि हॉटेल वर पोचले तर समोर एक सुंदर कॅसल होता .. जसा परिकथेत असतो अगदी तस्साच. थंडी मात्र प्रचंड आणि बर्फ तर इतका कि पाय ठेवला कि बुडून जाऊ कि कायअसं वाटत होते . वीकएंड हॉटेल मध्ये बसून काढला कारण कोणी ओळखीचे नाही आणि बाहेर थंडी मुळे जाणे शक्य नव्हते. सोमवारी गीतू पुण्याहून आली आणि येताना मटार उसळ आणि पोळ्या घेऊन आली आणि ४८ तासात पहिल्यांदा पोटभर जेवले ! नंतरचे १५ दिवस फार मस्त गेले. का कुणास ठाऊक पण आपल्याला जसा शहरी लोक आणि ग्रामीण लोकांशी बोलताना फरक जाणवतो आपुलकीचा तसा मला इंग्लंड, अमेरिका आणि पूर्व युरोपातल्या ह्या देशात जाणवला. भाषा येत नाही म्हंटल्यावर आपणहून सगळीकडे सोबत करायची, शाकाहारी आहे हे कळल्यावर आपल्या आवडीचे मिळेल ह्याचा आटोकाट प्रयत्न करायचा असासगळा प्रेमाचा आणि आपुलकीचा मामला. आणि बुडापेस्ट शहर तर नितांत सुंदर. तो चेन ब्रिज, ती शांत वाहणारी डेन्युब नदी आणि ठाई ठाई उत्तम शिल्पकलेचे आठवण करून देणारे राजवाडे, चर्चेस. हंगेरी ला म्हणे पूर्वेचे इटली म्हणतात . म्हणजे त्या सिनेमात अगदीच चुकीचे दाखवले नव्हते म्हणायचे !!
परत आल्यावर पु. लं चे जावे त्यांच्या देशा मधले 'हंगेरी माझा नवा स्नेही' वाचले आणि पुनश्च बुडापेस्ट च्या प्रेमात पडले ते अजून बाहेर पडले नाही आहे. त्या नंतर पुन्हा कधी जाण्याचा योग तर नाहीच आला पण तिथे गेलेले कोणी भेटले सुद्धा नाही.
शाळेत असताना देशांच्या राजधान्या पाठ करत असताना हंगेरी - बुडापेस्ट, रोमेनिया - बुखारेस्ट असे ताला सुरात पाठ केले होते. तेंव्हा कधी बुडापेस्ट ला जाऊ असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. बघू आता बुखारेस्ट ला जायचा कधी योग येतोय :)