Posts

Showing posts from 2016

ऋणानुबंधाच्या ...

एखादे ठिकाण आपल्याला का आवडत असावे असा विचार करत होते. तिथल्या सृष्टी सौंदर्य मुळे, त्याच्या नाम महात्म्यामुळे  कि आपल्या तिथल्या वास्तव्याच्या सुखद आठवणींमुळे. सगळी कारणे बरोबर असावीत पण कालपरत्वे सृष्टी सौंदर्य फारसे लक्षात राहत नाही पण तिथे भेटलेली माणसं मात्र कायम स्मरणात राहतात. काहींशी तुमचे त्यांच्याशी पूर्वजन्मीचे नाते असावे असे बंध जुळतात. पहिला परदेश प्रवासाचा अनुभव हा  बराचसा 'दुरून डोंगर साजरे'सदरात  मोडतो. जाताना जेवढा उत्साह असतो तो तिथे प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांनी पार नाहीसा होतो. माझं काहीसे तसेच होता होता राहिले त्याचे कारण अभ्यंकर काका. लंडन मधील पहिला आठवडा भयंकर गेला होता. खाण्याची प्रचंड आबाळ, नवीन वातावरण, राहायची नीट सोय नाही. एक वेळ तर सगळा  गाशा गुंडाळून  परत जावे ह्या विचाराप्रत आले होते आणि तेंव्हा कोणीतरी अभ्यंकर काकांचा पत्ता दिला की ते  पेइंग गेस्ट ठेवतात म्हणून. मी त्यांना फोन केल्यावर ते म्हणाले जरूर राहायला ये, आम्ही वाट पाहतो आहे. सगळं सामान आवरुन  त्यांच्या कडे पोचायला मला त्या दिवशी र...

प्रातःस्मरण

खरंतर आमच्या घरात कोणी भाविक किंवा आस्तिक वगैरे नाही. आजी आजोबाच आस्तिक नव्हते त्यामुळे आम्ही पण कुणी नाही.   आस्तिक नाही म्हणजे नास्तिक होते इतका सरळ त्याचा अर्थ नाही. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता असं  म्हणू हवं तर .  मी आजोबांना (ज्यांना आम्ही भाऊ म्हणत असू)  कधीच पूजा करताना किंवा देवळात जाताना पहिले नाही. आजी करत असे पण ते 'देह देवळात चित्त ... ' अशा प्रकारची रोजची पूजा असे. लक्ष स्वैपाकघरात कुकर च्या  किती शिट्ट्या झाल्या आहेत किंवा काकू ला काहीतरी सूचना देणे चालू असे पूजेच्या वेळी. ह्या सगळ्याला विसंगत वाटावे अशी एक गोष्ट मी आणि त्यांच्या सर्व नातवंडांनी लहानपणापासून  पहिली ती म्हणजे भाऊ रोज सकाळी न चुकता एक प्रातःस्मरण  म्हणत असत. त्यात ईशावास्योपनिषदातले श्लोक, तुकारामांचे  अभंग , संस्कृत श्लोक, हिंदी दोहे असे सगळं असे. ते त्यांनी कुठून जमवले होते किंवा त्याच क्रमाने का म्हणत असत हा प्रश्न तेंव्हा पडला नाही आणि आज पडून सांगायला ते नाहीत.  बाबा, काका सांगतात कि ते त्यांनी त्यांच्याही बालपणापासून ऐकले...