Posts

Showing posts from December, 2017

बागकाम एक आनंद

 कुठल्याही छंदात रमून जाणे, तहान भूक हरपून जाणे, कशाचे वेड लागणे वगैरे गोष्टी माझ्या बाबतीत कधी झाल्याचं नाहीत, खूप इच्छा असूनही. पूर्ण केलेल्या छंदांपेक्षा अर्धवट सोडलेले छंद अमाप आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी मी एका निष्कर्षाला आले होते कि आपल्याला काही छंद लागणे शक्य नाही किंवा ४ जणांना आहे म्हणून आपल्याला असायलाच हवा असं  हि काही नाही. माझ्या लहानपणी आमची खूप छान  फुलबाग होती. मोगरा, सायली, गुलाब, शेवंती, झेंडू अशी अनेक फुलझाडे होती. आमचे घर तर फुलांसाठीच ओळखल्या जायचे. बाबा खूप प्रेमानी जोपासायचे आणि मी मात्र सुंदर आलेली फुले तोडून शाळेत बाईंना किंवा आवडत्या मैत्रिणींना देऊन भाव खात असे. पुढे नागपूर सोडून पुण्याला आलो तिथेही गच्चीवर गांडूळखत वापरून बाबानी सुंदर बाग  फुलवली होती आणि लोकं दुरून दुरून पाहायला येत होते. इथे पण माझा सहभाग फोटो काढणे आणि भाव खाणे इतकाच होता.  पुढे ते घर सोडून फ्लॅट मध्ये आलो आणि अगदी छोटी गच्ची वाट्याला आली. अनेक दिवस काहीच फुलझाडे नव्हती. कधी आणली तर ती कबुतरांनी खराब केली. मग आम्ही बर्ड नेट लावून घेतली आ...