अतर्क्य ना घडले काही ...
गेल्या ३-४ महिन्यात २ घटना अशा घडल्या ज्यामुळे असे वाटते कि माणसाला आपण आणि आपले प्रियजन अमरपट्टा घेऊन जन्माला आले आहे असे वाटते का ! एका घटनेत शाळकरी सोबती आपल्या पत्नी सह मध्यरात्री स्वतः गाडी चालवत येत होता आणि झोप जी काळा प्रमाणे कधी घाला घालेल सांगता येत नाही तशी ती आली आणि भीषण अपघात होऊन तो वाचला पण पत्नी जागीच गेली. दुसऱ्या एका घटनेत एक लहानगी वरच्या मजल्यावरून पडून गेली. घराच्या मोठ्यांचे थोडेसे दुर्लक्ष ह्याला कारणीभूत ठरले. दोन्ही वेळा प्रचंड हळहळ व्यक्त झाली आणि जे लोक अप्रत्यक्ष जबाबदार होते त्यांना आयुष्यभराचे 'survivor guilt' लागून राहिले. कळत नकळत म्हणायचे कि कळतंच आपण सगळे जण अशा चुका करतो. बरेचदा काहीच होत नाही म्हणून सुरक्षेचे नियम धुडकावून लावतो. काहीवेळा आपल्याला चाहूल लागते सुद्धा कि काही विपरीत घडेल पण सुदैवानी तसे होत नाही आणि आपण पुन्हा बेफिकिरीने वागू लागतो . नियम पाळायच्या बाबतीत आपण भारतीय जरा जास्तीच बेपर्वा आहोत असे जाणवते इतर देशात जाऊन आल्यावर. मी स्वतः पण त्याला अपवाद नाही. कॉलेज मधली घटना ...