Posts

Showing posts from February, 2017

बुडापेस्ट - हम दिल दे चुके सनम

मध्ये एकदा चॅनेल सर्फिंग चा रिकामटेकडा उद्योग करताना 'हम दिल दे चुके सनम' लागला   होता आणि त्यातला   शेवटचा फार भावुक प्रसंग चालू होता ज्यात ऐश्वर्या अजय देवगण कडे परत जाते.   पण  माझे लक्ष मात्र दर वेळी हा प्रसंग पाहताना मागच्या रोषणाई केलेल्या ब्रिज कडे जाते. कारण जरी सिनेमात ते दृश्य इटली मधले  आहे असे सांगितले आहे  तरी त्या सर्व सिनेमाचे शूटिंग मात्र बुडापेस्ट ला झाले आहे. बुडापेस्ट ला गेल्या गेल्या आमच्या कंट्री मॅनेजर ने दिलेली हि पहिली माहिती जी आजवर माझ्या लक्षात आहे ! काही माणसं किंवा जागा ह्यांच्याशी आपला अगदी अल्पकाळ संबंध आला असला तरी कायम आपल्या मनात जागा धरून असतात. बुडापेस्ट हा असाच माझ्या  reminiscences चा भाग आहे. ज्याचा डिक्शनरी मधला अर्थ 'भूतकाळाच्या रम्य आठवणी' आहे.  भूगोलाबाबतच्या अज्ञानामुळे जायला निघाले तेंव्हा हंगेरी हा देश नक्की आहे तरी कुठे हे पाहण्या पासून तयारी. पूर्व युरोपात आहे इतकीच माहिती. आणि आपल्या कडून तिथे जायला फ्रॅन्कफुर्ट मार्गे जावे लागते असे कळले. तिथली भाषा माग्यार आणि चलनाचे नाव forint  हि ...