Posts

Showing posts from January, 2017

आमच्यावेळी ना ...

 गेल्या महिन्यात झालेल्या reunion मध्ये जवळपास ३० वर्षांनी शाळकरी सोबती भेटले.आणि मग आठवणींचे धबधबे वाहू लागले.  एक जण सांगत होता कि BE झाल्यावर ह्या मित्रांनी गोव्याला जायचे ठरवले होते आणि कुठल्यातरी तारखेला मिरज स्टेशन वर १० जण जमणार होते आणि चक्क १० जण १० ठिकाणहून येऊन भेटले आणि एकदम मस्त गोवा ट्रिप झाली ज्याची आठवण आजही ताजी  तवानी आहे. फोन फारसे कुणाकडे नव्हते पण तरी निरोप पोचले आणि ठरल्याप्रमाणे सर्व झाले. आणि मग गाडी नेहमीप्रमाणे आपल्या वेळी कसं होते  आणि आत्ताच्या मुलांना कित्ती काही काही लौकर मिळाले ह्यावर घसरली. तेंव्हा  पत्रं पाठवली कि उत्तर यायला २-३ आठवडे लागत . आवडती गाणी ऐकायला दिवस दिवस रेडिओ ऐकत असू. सिनेमा मॉर्निंग , मॅटीनी, इव्हनिंग अशात होता. रेल्वे तिकिटासाठी तास तास रांगेत उभे राहत असू. TV  वर एकमेव दूरदर्शन चॅनेल . एक ना दोन असंख्य गोष्टी ज्यात काल आणि आज मध्ये भयंकर तफावत आहे. अशी तफावत लक्षात येऊ लागली हि बहुदा वय वाढू लागल्याची खुण आहे ज्यामुळे मन मागे मागे जायला बघते आणि जुनेच कसे सोने होते असं  वाटू लागते...