Posts

Showing posts from September, 2017

सकाळची शोभा

Image
आज टेकडीवर फिरायला गेले तेंव्हा टेकडी नेहमीप्रमाणे हिरवीगार होतीच पण पहाटेच्या सूर्याचे इतके मनोहारी दर्शन झाले कि ते वर्णन करू शकीन इतकी प्रतिभा माझ्या जवळ नाही. फोटो मधून जे  दिसते आहे त्या पेक्षा खूप विलक्षण दृश्य होते. घरी आल्यावर ताई ला फोटो दाखवला तेंव्हा ताई आपसूक हि कविता म्हणू लागली. आता भा. रा. तांबे च्या प्रतिभेने अचंबित होऊ कि प्रत्यक्ष दृश्याने इतकाच काय तो प्रश्न ... मूळ कवितेचे शीर्षक सायंकाळची शोभा असे आहे पण त्यातले बरेचसे वर्णन जसेच्या तसे लागू पडते सकाळच्या शोभेला पण.   पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे  झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे ईंद्रघनुष्याचे अशी अचल फुलपाखरे, फुले साळिस जणू झुलती साळीवर झोपली जणूं का पाळण्यांत झुलती. झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी उडती! हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती! पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा. कुठे बु...